जागतिक आदिवासी दिनी विविध कार्यक्रम; उपस्थित राहण्याचे आयोजकांकडून आवाहन

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । ९ आँगस्ट रोजी जागतिक आदीवासी दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.या कार्यक्रमाला तालुक्यातील सर्व समाज बांधवांनी उपस्थित राहण्याचे आवाहन कोळी समाजाचे जितेद्र सपकाळे यांनी केले आहे.


यावल तालुका आदीवासी टोकरे कोळी सामाज बांधवाची बैठक यावल तालुका सहकारी खरेदी विक्री संघाच्या सभागृहात आयोजित करण्यात आली होती. यावेळी ९ आँगष्ट्र २४ रोजी जागतिक आदीवासी दिन साजरा करण्या बाबत बैठकीत चर्चा करण्यात आली. यावल येथीलखरेदी विक्री सहकारी विक्री संघाच्या सभागृहा पासून तर धनश्री टाँकीज पर्यत सजीव देखावा काढुन आदीवासी दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्याचा विषय सर्वाचा मते मंजूर करण्यात आले.

उत्सव समीतीची कार्यकरीण जाहीर
अध्यक्षपदी प्रविण सोनवणे, उपाध्यक्षपदी जितू कोळी भालोद ,विजय मोरे साक्री, खजिनदार खेमचंद कोळी पाडळसा, प्रसिद्ध प्रमुख पदी गोकुळ कोळी, तर सदस्यपदी कीरण कोळी दहिगाव, धनराज कोळी अट्रावल, संदिप सोनवणे दुसखेडा , राहुल तायडे बामणोद, भरत कोळी यावल, रोहिदास सपकाळे पिंप्री, पदमाकर कोळी डोंगरकठोरा, भिकन सपकाळे अंजाळे, नामदेव कोळी ,प्रमोद सोनवणे कीरण कोळी पाडळसा सदस्यपदी निवड करण्यात आली.

यावेळी नंदुभाऊ सोनवणे, बबलु कोळी, प्रमोद सोनवणे, सागर कोळी राजोरा, भरत पाटील भुसावळ, संजय नन्नवरे यावल, गोकुळ कोळी बोरावल, दिपक तायडे अट्रावल, योगेश कोळी अट्रावल योगेश कोळी पिंपरूड सह समाज बांधवांनी मार्गदर्शन केले.

Protected Content