धरणगाव, प्रतिनिधी | आज ‘राष्ट्रीय ग्राहक हक्क दिना’निमित्ताने अखिल भारतीय ग्राहक पंचायत धरणगांव तालुकातर्के ‘पिंप्री खुर्द येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी निबंध स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस वाटप करण्यात आले.
‘राष्ट्रीय ग्राहक हक्क दिना’निमित्ताने आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच योगिता विजय सुर्यवंशी होत्या. तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा उपाध्यक्ष दिनेश तायडे, नायब तहसिलदार मोहोळ यांची उपस्थिती होती. तालुका अध्यक्ष सुनिल बडगुजर यांनी प्रास्ताविक करून गाहकांचे शोषण व्यापारी वर्ग कसा करतो,व आपली होणारी फसवणूक कशी टाळावी याविषयी मार्गदर्शन केले. राष्ट्रीय ग्राहक दिवसानिमित्ताने माध्यमिक शाळा स्तरावर ‘जागो ग्राहक जागो’ व’ग्राहकांचे शोषण’या विषयावर निबंध स्पर्धचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धत प्रथम क्रमांक पिंप्री कन्या विद्यालय आफरीन अल्लाउद्दीन खाटीक ,व्दितीय क्रमांक प. रा. विद्यालय धरणगाव पल्लवी दिपक सोनवणे आणि तृतीय क्रमांक नि. हा चावलखेडा तेज’स्विनी किशोर पाटील या विद्यार्थिनीनी पटकावला. विजेत्याना ट्राफी व प्रत्येकी ३००रु रोख स्वरुपात बक्षिस म्हणून देण्यात आले. जळगाव जिल्हा उपाध्यक्ष दिनेश तायडे यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमास सरपंच ,उपसरपंच, नायब तहसिलदार मोहोळ, तालुका पुरवठा अधिकारी घुले , स.पुरवठा आधिकारी नेहेते, ,तालुका सदस्य बाबुलाल बडगुजर , ग्रामसेवक, तलाठी किल्लोरे यांचे विनायक महाजन तालुका संघटक यांनी सर्वांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत केले. विनायक महाजन यांनी आभार मानले.