फैजपूर ता. यावल (प्रतिनिधी) । यावल तालुक्यातील फैजपूर येथे नेहरू युवा केंद्र आणि त्रिवेणी बालगोपाल गोफ भजनी मंडळाच्या वतीने स्वच्छ भारत अभियानाचा समारोप करण्यात आला. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्ताने विविध स्पर्धाचे आयोजन करण्यात आले.
आयोजित केलेल्या विविध स्पर्धामध्ये वकृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा व चित्रकला यांचा समावेश होतो. स्पर्धांमध्ये गावातील अनेक विद्यार्थ्यांनी व त्रिवेणी बालगोपाल गोफ भजनी मंडळाच्या सदस्यांनी आपला उस्पूर्तपणे सहभाग नोंदविला. त्यावेळी विद्यार्थ्यांना स्वच्छते विषयी व सरदार वल्लभभाई पटेल यांच्या विषयी माहिती देण्यात आली. स्पर्धा झाल्यानंतर सर्व विद्यार्थ्यांना राष्ट्रिय एकता शपथ देण्यात आली.
स्वच्छ भारत अभियानाचा समारोप व सरदार वल्लभभाई पटेल कार्यक्रम प्रसंगी फैजपूर येथील त्रिवेणी बालगोपाल गोफ भजनी मंडळाचे अध्यक्ष राहूल साळी,रोहन चौधरी,भावेश पाटील, शुभम पाटील, पुष्कर चौधरी इ. उपस्थित होते आणि कार्यक्रमाला त्रिवेणी गणेश मित्र मंडळाचे खजिनदार चेतन चौधरी सर हे पर्यवेक्षक म्हणून लाभले.तर कार्यक्रमाचे कामकाज नेहरू युवा केंद्र जळगावचे जिल्हा युवा अधिकारी नरेंद्र डागर व लेखपाल अजिंक्य गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली यावल तालुका समन्वयक तेजस पाटील,पल्लवी तायडे, डिगंबर चौधरी यांनी केले.
या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी त्रिवेणी बालगोपाल गोफ भजनी मंडळ फैजपूर अध्यक्ष राहूल साळी, रोहन चौधरी व त्रिवेणी गणेश मित्र मंडळ फैजपूरचे कार्यकर्ते गणेश चौधरी, चेतन चौधरी, भावेश चौधरी, भूषण चौधरी, अनिरुद्ध पाटील,मोहित कोलते, संकेत चौधरी व नेहरू युवा यावल तालुका समन्वयक पल्लवी तायडे, डिगंबर चौधरी यांनी परिश्रम घेतले.