वाणी समाज महिला मंडळाच्या वतीने विविध स्पर्धा व गुणवंतांचा सन्मान

पारोळा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | लाडशाखीय वाणी समाज संस्कृती महिला मंडळाच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त नाटिका, नृत्य, एकपात्री अभिनय, स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. यावेळी समाजातील गुणवंत महिलांचा सत्कारही करण्यात आला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लाडशाखीय वाणी समाज मंडळ अमळनेरच्या अध्यक्षा प्रा. रंजना देशमुख होत्या, तर प्रमुख पाहुण्या म्हणून आदर्श शिक्षिका रेखा कोठावदे, माजी अध्यक्षा अंजली मुसळे व सीए परीक्षा उत्तीर्ण निशा गोविंद शिरोळे उपस्थित होत्या. कार्यक्रमाची सुरुवात कु. स्वरा बधान हिने गणेशवंदनेने केली, तर योगिता येवले, ज्योती शिनकर यांनी ईशस्तवन गीत सादर केले. सुनिता भामरे व वृषाली मालपुरे यांनी स्वागतगीत सादर केले. सांस्कृतिक सत्रात सोळा कुलस्वामिनी भगिनी समूहाने महाराष्ट्रीयन उत्सवावर आधारित गीते व नृत्य सादर केले. भारूड, गौळण या लोककला कार्यक्रमांनीही उपस्थितांची मने जिंकली.

संस्कृती मंडळाच्या भगिनींनी सासू-सुनेच्या नात्यातील गोडवा व जुगलबंदी यावर आधारित नाट्य सादर केले. साधना वाणी व सुनिता भामरे यांनी जात्यावरच्या ओव्या सादर करून ग्रामीण संस्कृतीचे दर्शन घडवले. सोनाली कोठवदे यांनी “माझी लेक” सादर केले, तर सोनाली शेंडे यांनी “महाराष्ट्र गीत” गात प्रेक्षकांची दाद मिळवली. विविध वेशभूषांमध्ये जिजामाता म्हणून सुनिता शिरोळे, तर राणी लक्ष्मीबाई म्हणून उज्वला शेंडे यांनी उत्तम अभिनय सादर केला. शोभा बधान व कन्या स्वरा बधान यांनी मराठी गाण्यावर मनमोहक नृत्य सादर केले.

माधुरी अमृतकार यांनी गृहिणीच्या भूमिकेचे महत्व सांगितले. कु. निशा शिरोळे हिने सीए परीक्षेत यश मिळवण्यासाठी आवश्यक असलेल्या मेहनतीविषयी आपले अनुभव कथन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षा प्रा. रंजना देशमुख यांनी समाजातील कुटुंबव्यवस्था व विवाहसंस्थेवरील वाढत्या समस्या यावर मार्गदर्शन केले. कार्यक्रमात सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. सुत्रसंचालन निता नावरकर व वृषाली मालपुरे यांनी केले, तर प्रस्तावना सुनंदा शेंडे यांनी केली. माधुरी अमृतकार यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी मंडळाच्या अध्यक्षा प्रा. वर्षा पुरकर, उपाध्यक्षा रुणल कोतकर, सचिव वर्षा कोठावदे, खजिनदार दीपिका शेंडे, संचालिका विद्या येवले, वंदना शेंडे, अर्चना मैंद व शीतल टिपरे यांनी परिश्रम घेतले.

 

<p>Protected Content</p>