जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी करण्यासाठी त्यांच्या कार्यकर्तृत्व व शौर्यावर आधारित विविध कार्यक्रमांचे आयोजन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
संभाजी राजे नाट्यगृह शेजारील मैदानावर १८ फेब्रुवारी रोजी सकाळी ९.०० वाजता गडकिल्ले स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे. तसेच १८ फेब्रुवारी रोजी सकाळी ९.०० वाजता भाऊंचे उद्यान, काव्य रत्नावली चौक येथे चित्रकला स्पर्धा घेण्यात येणार आहे.

याशिवाय छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित नाट्य व सांस्कृतिक कार्यक्रम १८ व १९ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६.०० ते ९.०० या वेळेत संभाजी राजे नाट्यगृह, महाबळ येथे आयोजित करण्यात आले असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी तथा अपर जिल्हादंडाधिकारी वैशाली चव्हाण जळगाव यांनी दिली आहे.



