पाचोरा -लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | पाचोरा रेल्वे स्थानकावर ‘स्वच्छ संवाद दिवस’ साजरा करण्यात आला. या उपक्रमाचे भुसावळ रेल्वे विभागाचे अप्पर रेल्वे प्रबंधक रुक्मय्या मीना यांनी भेट देवून कौतुक केले.
रेल्वे प्रशासनातर्फे भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त दि. १७ सप्टेंबर ते दि. २ ऑक्टोंबर दरम्यान “स्वच्छता पंधरवडा” साजरा करण्यात येत आहे. या कार्यक्रमाचा एक भाग म्हणून शनिवार दि. १७ सप्टेंबर रोजी “स्वच्छ संवाद दिवस” साजरा करण्यात आला. भुसावळ रेल्वे विभागाचे अप्पर रेल्वे प्रबंधक रुक्मय्या मीना यांनी पाचोरा रेल्वे स्थानकावर धावती भेट देऊन उपक्रमाचे कौतुक केले.
या कार्यक्रम प्रसंगी पाचोरा रेल्वे स्टेशन प्रबंधक एच. टी. जाधव, मुख्य आरोग्य निरीक्षक हेमराज मीणा, मुख्य वाणिज्य निरीक्षक चंद्रकांत कवडे, आर. पी. एफ. कर्मचारी भिकन सुरवाडे, बुकींग पर्यवेक्षक परिमल मंडल, क्लिनिंग सुपरवायझर शरद अहिरे, तथा रेल्वे कर्मचारी यांचे समवेत मिठाबाई कन्या विद्यालयाचे पर्यवेक्षक सुवर्णसिंग राजपूत, प्रा. शिवाजी शिंदे, उज्वला महाजन, कुंदा पाटील, वरिष्ठ लिपिक शिवाजी बागुल, निलेश कोटेचा, ए. जे. महाजन, जयदिप पाटील, आबाजी पाटील, आदी कर्मचारी उपस्थित होते.
स्वच्छता पंधरवडा निमित्ताने आजच्या विशेष उपक्रमात पाचोरा रेल्वे स्थानकावरील कार्यरत अधिकारी, कर्मचारी आणि शहरातील माध्यमिक व उच्च माध्यमिक मिठाबाई कन्या विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने रेल्वे स्थानकावर स्वच्छतेची शपथ घेऊन स्वच्छता विषयक जनजागृती रॅली काढण्यात आली.
यावेळी रेल्वे प्लॅटफॉर्म क्रमांक एक, दोन व तीन वर विद्यार्थीनींनी स्वच्छता विषयक घोषणा देत प्रवाशांमध्ये जनजागृती केली. तसेच रेल्वे स्थानकावर उपस्थित प्रवाशांसोबत स्वच्छता विषयक सुसंवाद करण्यात आला. तसेच रेल्वे फलाटावरील स्वच्छतेची जनजागृती करण्यासाठी रेल्वेचे कर्मचारी तसेच विद्यार्थीनी, शिक्षक यांनी सामूहिकरीत्या रेल्वे प्लॅटफॉर्मची स्वच्छता केली. रेल्वे अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांना रेल्वेच्या स्वच्छता मोहिमेची माहिती करून देत स्तुत्य उपक्रमाचे कौतुक देखील केले.