पारोळा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | पारोळा तालुक्यातील वंजारी खु येथे कै. चि. स्वामीप्रसादसिंह राजपुत याच्या २६ व्या जन्म दिनानिमीत्त महाराणा प्रताप सिंह स्मारकाच भव्य लोकार्पण सोहळा शनिवार संध्याकाळी ५ वाजता महाराणा प्रताप नगर, वंजारी खु. येथे संपन्न झाला. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष संत रविदास महाराज समर्पण गोशाळा तरवाडेकर हे होते. स्मारकाचे लोकार्पण माजी आमदार महेंद्रसिंह धरमसिंह राजपुत यांच्याहस्ते करण्यात आले. या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून चतुर बाबुराव राजपुत, रामचंद्र पुंडलीक राजपुत (जळगांव), लखीचंद प्रकाश राजपुत, जगदीश पुंडलीक राजपुत (खडके), जितेंद्र गोकुळ राजपुत (सरपंच : बोदडें / वंजारी), कुमारसिंग भिमसिंग राजपुत (वजन माप निरीक्षक जळगांव), मनोज नरसिंग राजपुत (सरपंच: सार्वे), रामचंद्र राजपुत, इंद्रसिंग लुभानसिंग राजपुत (सावरखेडे) हे होते.
या सोहळ्याचे आयोजन पत्रकार राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे कोअर कमिटी राज्य अध्यक्ष बाळासाहेब हिलाल राजपुत, नितीन राजपुत, श्यामकुमार राजपुत, योगेश राजपुत, प्रदिप राजपुत, किरणसिंग राजपुत यांच्यासह स्व. स्वामी प्रसादसिंह राजपुत युवा फाऊंडेशन महाराणा प्रताप नगर (वंजारी खु।।) बोदडें यांनी केले होते. जुन्या रुढी परंपरा यांना तिलांजली देऊन, शिक्षणाची कास धरा, असा संदेश माजी आमदार महेंद्रसिंग पाटील राजपूत यांनी दिला. प्राध्यापक रामचंद्र पाटील यांनी राजपूत हे फक्त मिरविण्याचे पद नसून आपण ज्या क्षेत्रात आहोत त्या क्षेत्रात चमकले पाहिजे आघाडीवर असले पाहिजे. व्यसनाधीन न राहता समाज उन्नतीसाठी सदैव तत्पर असला पाहिजे असा संदेश त्यांनी दिला. स्मारके हे तरुणांना स्फूर्ती देणारे ठिकाण असतात ती प्रत्येक गावागावात झाली पाहिजे. समाज गाव व देश याविषयी आत्मीयता निर्माण करून त्यासंदर्भात तरुणांनी पुढे आले पाहिजे व समाजाने एकत्र येऊन एकजूटता दाखवून गावात विकास कामे करण्यासाठी मदत केली पाहिजेल असे मार्गदर्शन संत रविदास महाराज तरवाडेकर यांनी दिला. महाराणा प्रतापानी समाजासाठी प्रेरणा दिले त्या प्रेरनेचे अवलोकन तरुणांनी करावे असे चतुर राजपूत यांनी यावेळी सांगितले. तर जगदीश पाटील यांनी महाराणा प्रताप यांचे आदर्श अंगीकारून आता ढाल तरवारीने न लढता कलम व शिक्षणाने लढावे लागेल कारण शिक्षण हे वाघीनीचे दूध असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिल चौधरी सर यांनी केले तर आभार प्रदर्शन बाळासाहेब पाटील यांनी केले. यावेळी वंजारी बोदर्डे यासह परिसरातील समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.