धरणगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील वंजारी बु॥ येथील जि.प.शाळेत स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला.
वर्ल्ड व्हिजन या आंतरराष्ट्रीय संस्थेचे धरणगाव तालुक्याचे व्यवस्थापक अनिल वल्लुरकर यांच्या हस्ते शाळेचे ध्वजारोहण करण्यात आले. गावातील लोकांनी विविध कार्यक्रमाद्वारे शिक्षक लोकांची मने जिंकून घेतली. वर्ल्ड व्हिजन या संस्थेने वंजारी बु॥ हे गाव १५ वर्षांसाठी दत्तक घेतले असून शाळेचे मुख्याध्यापक किशोर पाटील यांनी वर्ल्ड व्हिजन या आंतरराष्ट्रीय संस्थेची स्थापना, विचार, हेतु, याविषयी गावकऱ्यांमध्ये जाणीव जागृती केली.
ही संस्था आर्थिक – सामाजिक दुर्बल घटकांतील जीवनमान दूर करण्याच्या मानवतावादी दृष्टिकोनातून धरणगाव तालुक्यात काम करीत आहे. निधी प्राप्त झाल्यास जि.प.शाळा वंजारी बु॥ येथे सुसज्ज किचनशेड बांधण्याचे अनिल वल्लुरकर यांनी आश्वासित केले.
राजेंद्र पाटील, वर्षा साळुंखे, रुपाली शिंदे यासह शाळेतील शिक्षकांनी कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडला.