कारण नसतांना तरूणाच्या दुचाकीची तोडफोड

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील पिंप्राळा येथील मढी चौकात दारूच्या नशेत येवून कारण नसतांना एकाने तरूणाची दुचाकीची तोडफोड करून नुकसान केल्याची घटना मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी सकाळी ११ वाजता रामानंद नगर पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, शहारूख शेख रहिद वय २९ रा. मढी चौक, पिंप्राळा, जळगाव हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. सोमवारी २९ जुलै रोजी मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास राकेश नावाच्या व्यक्तीने काहीही कारण नसतांना त्यांची दुचाकी (एमएच १८ क्यू ८३०२) ही घरासमोर पार्कींगला लावलेली असतांना तोडफोड करून नुकसान केल्याची घटना घडली आहे. याबाबत शहारूख शेख रामानंद नगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार राकेश (पुर्ण नाव व पत्ता माहित नाही) यांच्याविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार संजय सपकाळे हे करीत आहे.

Protected Content