मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | लोकसभा निवडणूकीसाठी वंचित बहूजन आघाडीने गेल्या आठवडयात आपल्या उमेदवारीची यादी जाहीर केली होती. या यादीत परभणीतून बाबासाहेब उगले यांना उमेदवारी दिली होती. परंतू आता अचानक वंचितने परभणीतून उमेदवार बदलला आहे. त्यांच्या जागी पंजाबराव डख यांना उमेदवारी दिली आहे.
पंजाबराव डख हे हवामान अभ्यासक आहे. त्यांच्यासमोर परभणीत महाविकास आघाडीकडून संजय उर्फ बंडू जाधव आणि महायुतीकडून महादेव जानकर हे रिंगणात आहेत. वंचित बहूजन आघाडीने आतापर्यंत १९ उमेदवार लोकसभा निवडणूकीसाठी जाहीर केले आहे.