जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । चंदू आण्णा नगर चौकातून वाळूची चोरटी वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर तालुका पोलिसांनी कारवाई केली असून याप्रकरणी एका जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव शहरातील चंदू आण्ण नगर चौकातून (एमएच २८ डी ६६८९) या क्रमाकांचे ट्रॅक्टर वाळूची चोरटी वाहतूक करत असल्याची माहिती तालुका पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलीस निरिक्षक रामकृष्ण कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मचाऱ्यांनी सोमवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास ट्रॅक्टरवर कारवाई केली. चालकाकडे वाळू वाहतुकीचा परवाना नसल्याने त्यावर कारवाई करण्यात येवून वाळूसह ट्रॅक्टर जप्त करण्यात आले आहे.याप्रकरणी पोलीस हेडकॉन्स्टेबल प्रमोद भिकन सपकाळे रा.कांचननगर याच्याविरोधात तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार विजय पाटील हे करीत आहेत.