आज प्रेम दिन अर्थात व्हॅलेंटाईन्स डे साजरा केला जात आहे. कुणी कितीही नाक मुरडले तरी याला उघड अथवा छुप्या पध्दतीत साजरा करणार्यांची संख्या खूप आहे. आणि प्रेम म्हटल्यानंतर गाणी आलीच. प्रेमातील प्रत्येक टप्प्यांवर गाणी आपली साथसंगत करत असतात. आज प्रेम दिनाचे औचित्य साधून प्रेमाचा गोडवा वाढवणारी याच प्रकारची गाणी आपल्यासाठी सादर करत आहोत.
१) पहला नशा…पहला खुमार- पहिल्या प्रेमातील मुग्धता अतिशय भावविभोर अवस्थेत अभिव्यक्त करणारे हे गाणे प्रेमीजनांच्या हृदयात घर करून आहे. ‘जो जिता वो ही सिकंदर’ चित्रपटातील या गाण्याचे चित्रकरण स्लो-मोशनमध्ये करण्यात आले असून ते याच्या गोडव्याला नवीन उंची प्रदान करणारे ठरले आहे.
https://vimeo.com/54691653
२) प्यार तेरी पहली नजर को सलाम- एक दुजे के लिये या चित्रपटातील सर्वच गाणी भन्नाट असली तरी ‘सोलह बरस की बाली उमर’ची बाब काही वेगळीच ! प्रेमातील विविध अवस्थांची एकाच ठिकाणी अनुभूती प्रदान करणारे हे गाणे प्रेमीजनांचे अतिशय आवडते आहे.
३) जिंदगी की ना तुटे लडी- क्रांती चित्रपटातील या गाण्यात क्षणभंगुर जीवनातील प्रेमाची महत्ता अतिशय विलक्षण पध्दतीत वर्णन करण्यात आली आहे. दोन घडी इतक्याच आयुष्यात प्रेम हेच सर्वतोपरी असल्याचे यातून सांगण्यात आले आहे. याचे चित्रीकरणदेखील तितकेच विलक्षण आहे.
https://www.youtube.com/watch?v=RFudTPm7siU
४) तुझ संग प्रीत लगाई सजना- कामचोर या चित्रपटातील हे गाणे प्रेमाची अतिशय विलक्षण अनुभूती प्रदान करणारे आहे. ”..इक तू ही मन को भाई है सजना” असे गुणगुणतांना प्रत्येकाला आयुष्यातील मर्मबंधातील ठेव नक्कीच आठवू शकते.
५) जब प्यार किया तो डरना क्या :- एखाद्या गाण्यातील शब्द हे उक्ती बनण्याचे उत्तम उदाहरण म्हणजे ‘मुगल-ए-आझम’ चित्रपटातील ‘जब प्यार किया तो डरना क्या’ हे गाणे होय. अनेक पिढ्यांच्या भावविश्वाचा अविभाज्य घटक बनलेले हे गाणे आजही तितकेच ताजे वाटते हे विशेष.
६) बस इक सनम चाहिए आशीकी के लिये- ज्या प्रमाणे श्वास हा जगण्यासाठी आवश्यक आहे अगदी त्याच प्रमाणे प्रेमही हवेच की ! आशिकी (१९९०) या चित्रपटातील सर्व गाण्यांमध्ये प्रेमगंध दरवळलेला आहे. मात्र यातील उत्कट अभिव्यक्ती आहे ती याच गाण्यात !
https://www.youtube.com/watch?v=XXNegdg5Ddg
७) तेरा होने लगा हू- अजब प्रेम की गजब कहानी चित्रपटातील तेरा होने लगा हू हे गाणे नव्या पिढीच्या भावविश्वाचा अविभाज्य घटक बनले आहे. ‘…कम अँड फिल मी’ असे आपल्या प्रेमीकेला थेट आर्जव यातून करण्यात आले आहे. आतीफ इस्लामचा आवाज याला चार चांद लावणारा ठरला आहे.
८) देखा एक ख्वाब तो ये सिलसिले हुये – सिलसिला चित्रपटातील हे गाणे म्हणजे रूपेरी पडद्यावरील एक अतिशय तरल असे भावकाव्यच होय. अमिताभ-रेखाच्या पडद्यावरील केमिस्ट्रीला मनमोहक निसर्ग आणि शब्द,सुर व संगतीचा साज यात चढविण्यात आला आहे. ‘फुल भी हो दरमिया तो फासले हुवे’ अशी मुलायम अनुभूती यात अभिव्यक्त करण्यात आली आहे.
https://www.youtube.com/watch?v=3mcssf587tI
९) मेरे प्यार की उमर हो इतनी सनम- वारीस चित्रपटातील हे गाणे प्रेमाची निस्सीम अनुभूती प्रदान करणारे आहे. माझे प्रेम हे तुझ्यापासून सुरू आणि तुझ्यावरच समाप्त असणारे असावे असे प्रत्येकाला आयुष्यात कधी तरी वाटते. हेच आकांक्षा गान यात आहे.
https://www.youtube.com/watch?v=M18yOH1-C7w
१०) यही सच है शायद मैने प्यार किया- मैने प्यार किया चित्रपटातील सर्वच गाणी एकापेक्षा एक सरस आहेत. यातील टायटल साँग प्रेमात असतांनाची स्वीकारोक्ती प्रदान करणारे आहे. अर्थात, याचमुळे ते हृदयाला स्पर्श करते.
११) आये हो तुम मेरी जिंदगी मे बहार बन के – राजा हिंदुस्थानी चित्रपटातील या गाण्याप्रमाणेच आपल्या आयुष्यात बहार यावी अशी प्रत्येकाची इच्छा असते. यालाच या गाण्यातून अभिव्यक्त करण्यात आले आहे.
१२) मेरा दिल भी कितना पागल है- साजन चित्रपटातील नायकाप्रमाणे आपलीदेखील की तरी अवस्था बनलेली असते. अर्थात, आपण प्रेम करत असलो तरी ते सांगू शकत नाही. ही गोड व्यथा या गाण्यातून जगासमोर आली आहे.
https://www.youtube.com/watch?v=-g6k8OKvwRo
१३) प्यार हुवा इकरार हुवा- जुन्या हिंदी चित्रपटांमध्येही अनेक अजरामर प्रेमगीते आहेत. यात ‘श्री ४२०’ या चित्रपटातील ‘प्यार हुवा इकरार हुवा’ या गाण्यातही प्रेमाच्या अभिव्यक्तीची अडचण विलक्षण भावपूर्ण पध्दतीत वर्णन करण्यात आली आहे.
१४) तू ही रे…- बाँबे या चित्रपटातील ‘तू ही रे’ हे अतिशय पॅशनेट अशा प्रेमाला अभिव्यक्त करणारे गाणे आहे. ए.आर. रहेमानसारख्या मास्टरचा स्पर्श लाभलेले हे गाणे प्रेमिकांना भावणारे आहे.
१५) दो दिल मिल रहे है- प्रेमातील नेत्रपल्लवीचा खेळ या गाण्यातून अभिव्यक्त झाला आहे. अर्थात, आपले हे गोड गुपीत कुणाला माहित नसल्याच्या गोड गैर समजुतीत प्रेमी जन असले तरी याचा बोभाटा कधी तरी होतच असतो. हेच यातून दर्शविण्यात आले आहे.
https://www.youtube.com/watch?v=RKB1LUojBVA
अप्रतिम