Home Uncategorized आर. ओ. तात्यांचा वारसा वैशालीताई पुढे नेत आहेत : उध्दव ठाकरे

आर. ओ. तात्यांचा वारसा वैशालीताई पुढे नेत आहेत : उध्दव ठाकरे

0
32

पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | आर.ओ. तात्या हे जमिनीशी जुडलेले नेते असल्याचे नमूद करत त्यांचा वारसा वैशालीताई समर्थपणे पुढे नेत असल्याचे कौतुकोदगार माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी येथे काढले. ते तात्यांच्या पुतळा अनावरण कार्यक्रमात बोलत होते.

माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याहस्ते आज निर्मल सीडस कंपनीच्या परिसरात उभारण्यात आलेल्या दिवंगत माजी आमदार आर. ओ. तात्या पाटील यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. याप्रसंगी शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत, जिल्हा संपर्क प्रमुख संजय सावंत यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

याप्रसंगी उध्दव ठाकरे यांनी तात्यांच्या आठवणींना उजाळा दिला. आपल्याला शेतकर्‍यांसाठी खूप काही करायचे असल्याचे नमूद केले. केंद्र व राज्य सरकार शेतकर्‍यांच्या विरोधात असल्याची टिका त्यांनी केली. तर, वैशालीताई सूर्यवंशी या तात्यांचा वारसा समर्थपणे पुढे नेत असल्याचे कौतुक देखील त्यांनी केले. दरम्यान, पुतळा अनावरण झाल्यानंतर उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत पाचोरा येथे भव्य सभेचे आयोजन करण्यात आले आहे.


Protected Content

Play sound