जळगाव प्रतिनिधी | येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात बुधवार दि. २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्त भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन करण्यात आले. त्यानंतर अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
सुरुवातीला सकाळी संविधानाच्या प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन करण्यात आले. त्यानंतर अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी ध्वजारोहण करीत ध्वजाला सलामी दिली. यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. किरण पाटील उपस्थित होते.
यावेळी डॉ. रामानंद यांनी, उपस्थित वैद्यकीय यंत्रणेशी संवाद साधला. ते म्हणाले की, कोरोना काळात डॉक्टर्सपासून सफाई कामगारांपर्यंत सर्वच घटकांनी सर्वोत्तम कामगिरी केली. प्रतिकूल परिस्थितीत देखील खंबीरपणे उभे राहत केलेली रुग्णसेवा हि प्रशंसनीय आहे, असेही डॉ. रामानंद म्हणाले.
यावेळी दोन्ही उप अधिष्ठाता डॉ. मारोती पोटे व डॉ.किशोर इंगोले, वैद्यकीय अधीक्षक डॉ. विजय गायकवाड, उप वैद्यकीय अधीक्षक डॉ. योगिता बावस्कर, अधिसेविका प्रणिता गायकवाड यांच्यासह सर्व डॉक्टर्स, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. सूत्रसंचालन जनसंपर्क सहाय्यक विश्वजीत चौधरी यांनी केले.