Home आंतरराष्ट्रीय ब्रिस्बेनमध्ये चमकला वैभव सूर्यवंशी; U19 क्रिकेटमध्ये ठोकले सर्वाधिक षटकार

ब्रिस्बेनमध्ये चमकला वैभव सूर्यवंशी; U19 क्रिकेटमध्ये ठोकले सर्वाधिक षटकार

0
125

ब्रिस्बेन – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज वृत्तसेवा ।  भारतीय अंडर-१९ संघातील युवा फलंदाज वैभव सूर्यवंशी याने ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील दुसऱ्या वनडे सामन्यात ऐतिहासिक कामगिरी करत नवा वर्ल्ड रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे. अवघ्या १४ वर्षांच्या या दमदार बॅटरने केवळ सामन्याचेच नव्हे, तर क्रिकेट विश्वाचेही लक्ष वेधून घेतले आहे. त्याच्या स्फोटक खेळीने भारतीय संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलत त्याचे नाव अंडर-१९ क्रिकेटच्या इतिहासात अजरामर केले.

ब्रिस्बेन येथील इयान हीली ओव्हल मैदानावर खेळवण्यात आलेल्या सामन्यात वैभव सूर्यवंशीने डावाची सुरुवात करताना ६८ चेंडूंमध्ये ७० धावांची शानदार खेळी साकारली. विशेष म्हणजे, त्याच्या या खेळीत त्याने ५ चौकारांसह तब्बल ६ षटकारांचा मारा करत उपस्थित प्रेक्षकांची मने जिंकली. या खेळीमुळे त्याने केवळ सामना गाजवला नाही, तर एक ऐतिहासिक विक्रमही आपल्या नावावर केला.

या सामन्यानंतर वैभवने आतापर्यंत खेळलेल्या १० अंडर-१९ वनडे सामन्यांत एकूण ३९ षटकार ठोकले आहेत. याआधी भारतीय अंडर-१९ संघाकडून सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम २०१२ मध्ये वर्ल्ड कप विजेत्या कर्णधार उत्मुक्त चंदच्या नावावर होता. उत्मुक्तने आपल्या अंडर-१९ कारकिर्दीत एकूण ३६ षटकार खेचले होते. मात्र, वैभवने केवळ १० सामन्यांतच हा विक्रम मोडीत काढत नवा इतिहास रचला.


Protected Content

Play sound