चोपडा प्रतिनिधी । चोपडा पिपल्स बँक सार्वजनिक सेवा ट्रस्ट, भारतीय जैन संघटना व वर्डी गावातील जनतेच्या लोकसहभागातून नाला खोलीकरण झालेल्याचे सार्थक झाले असे वर्डीतील जनतेने कौतुक करून सांगितले. जून महिन्यात ३ दिवसात रात्र दिवस मिळून जवळपास ७० तास पोकलॅन्ड मशिनच्या मदतीने हे काम करण्यात आले होते.
निघालेल्या मातीतुन काही शेतकऱ्यांनी शेती बंधारे, शेत रस्ते आदी विविध ठिकाणी वापरून नाला खोलीकरणला सहकार्य केले. २५ ट्रॅक्टरातून माती वाहतूक करण्यासाठी मदत केली होती. १३ ते १५ फूट खोल आणि अंदाजे १५० फुटची एक बँकेट अश्या २२ बँकेट तयार करण्यात आल्या आहेत. चोपडा तालुक्यात पाऊस तसा उशिरा झाला मात्र दि २ जुलै रोजी रात्री पावसाने हजेरी लावल्याने खोलीकरण केलेल्या नाल्यात पाणी साचले सोबत नाल्यात पाणी 2 ते 3 फूट जिरवन झाल्याने नालाखोलीकरण केलेले सार्थक झाले. या नाल्यात अजून फक्त ५० टक्के भरले आहे. तरीही वर्डीच्या जनतेने मात्र आनंद व्यक्त केले.
चोपडा पिपल्स बँक आणि भारतीय जैन संघटनेचे कौतुक केले आहे डॉ कांतीलाल पाटील व सहकार्यांनी आपले मत व्यक्त करत म्हटले की, माजी विधानसभा अध्यक्ष अरुणभाई गुजराथी यांच्या वाढदिवसाचे निमित्त साधत पिपल्स बँक सार्वजनिक ट्रस्टचे चेअरमन चंद्रहासभाई गुजराथी ,उपाध्यक्ष मोरेश्वर देसाई व सर्व संचालक मंडळ आणि भारतीय जैन संघटनेचे तालुका अध्यक्ष क्षितिज चोरडीया ,सचिव दिनेश लोडाया ,जिल्हा उपाध्यक्ष शांतीलाल कोचर,विभागीय जनसंपर्क प्रमुख लतीश जैन यांनी वर्डी गावात दोन ते तीन वेळा येऊन जनजागृती केली आणि नालाखोलीकरण साठी आम्हाला परावृत्त केले त्यांचे फळ अवघ्या २० दिवसात वर्डी वासीयांना पाहायला मिळाले असे गौरवाउदगार काढले.
यांनी मदत केली
बाळासाहेब पाटील, पद्माकर नाथ, डॉ.कांतीलाल पाटील, काशीनाथ पाटील, राजेंद्र देशमुख यांच्यासह गावातील शेतकरी बांधव, समाज सेवक, व्यापारी, वार्ताहर व सहकारी तसेच विशेष सहकार्य म्हणून विश्वास दौलतराव पाटील यानी सर्व नागरीकांनी भरपूर मदत केली.
खंत सोबतच जनजागृतीचे समाधान
गावातील ईतर उर्वरित नाले खोलीकरण सेवाभावी संस्था व लोकसहभागातून झाली असती तर वाया जाणारे पाणी जमीनीत जिरले असते व वर्डी गावात आलेले दुष्काळी सावट दुर झाले असते असे मत त्या ठिकाणी उपस्थित लहुश धनगर, संदीप पाटील, मुनाफ पिंजारी यांनी खंत व्यक्त केली. परंतु पिपल्स बँक सार्वजनिक सेवा ट्रस्ट व भारतीय जैन संघटनाने केलेल्या जनजागृती मुळे आज इतके तर काम झाले.
यांचे समाधान आहे. राजकारण व व्यक्तिगत व्देश, जात, धर्म जर दुर ठेवले तर गावाचा विकास व सामाजिक कामे निश्चित यशस्वी होतात. हे अनमोल उदाहरण आपल्या डोळ्यासमोर आहे. असेही वर्डीच्या नागरिकांनी आपले मत व्यक्त केले .