विरावली येथे लसीकरणाचे कार्य अंतिम टप्प्यात

यावल प्रतिनिधी । तालुक्यातील विरावली येथे आज (दि.०१ सप्टेंबर) रोजी विरावलीचे माजी सरपंच व शिवसेना जळगाव जिल्हा उपप्रमुख तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तुषार पाटील यांच्या प्रयत्नांनी आज संपूर्ण गावातील नागरिकांना लसीकरण करण्यात आले असून लसीकरणाचे कार्य अंतिम टप्प्यात पोहोचले आहे.

या कोविड प्रतिबंधक  लसीकरण कार्यक्रमाचे प्रारंभ माजी उपसरपंच सुभान तडवी यांना लसीकरणाने करण्यात आली. यात गावातील एकूण ६३० ग्रामस्थांनी लसीकरणाचा लाभ घेतला. याप्रसंगी सरपंच कलीमा तडवी, उपसरपंच मनीषा पाटील, ग्राम पंचायत सदस्य नथ्थू अडकमोल, इब्राहिम तडवी ,पोलीस पाटील चंद्रकांत पाटील, माजी पोलीस पाटील शिवाजी आबा पाटील, राजेंद्र पाटील, कौतिक अडकमोल, दामा अडकमोल, मुकुंदा भालेराव, भागवत पाटील, रवींद्र पाटील, समाधान पाटील, सुपडू तडवी, मिलिंद अडकमोल, नसीर तडवी, मेहबूब तडवी, दिनकर पाटील, आबा पाटील, धनराज पाटील, बस्तीलाल पाटील, शिवाजी पाटील, अनिल पाटील उपस्थित होते.

तसेच आरोग्य विभागाकडून आरोग्य सेविका मालती चौधरी, आरोग्य सेवक किशोर सहाने, समुदाय आरोग्य अधिकारी डॉ.अमोल अहिरे, आशा सेविका नम्रता पाटील यांनी परिश्रम घेतले. आज जवळपास संपुर्ण गावाचे कोविड प्रतिबंधक लसीकरण हे अंतीम टप्प्यात आल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त करीत शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख तुषार उर्फ मुन्ना पाटील यांचे आभार मानले.

 

Protected Content