फैजपूर प्रतिनिधी । शहराची लोकसंख्या जास्त असून लवकरात लवकर फैजपूरकरांना लसीकरण करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली होती. या मागणीस मान्यता मिळून येथील म्युनिसिपल हायस्कूलमध्ये कोविड लसीकरणास गुरुवारपासून नाव नोंदणीस सुरुवात होणार असून आ. शिरीष चौधरी यांचे हस्ते लसीकरणास प्रारंभ होणार आहे.
यामध्ये वय 45 चे वरील नागरिकांना लस दिली जाणार आहे. तरी गरजूंनी आधार कार्ड सोबत घेऊन लसीकरणासाठी जावे, असे नगराध्यक्ष महानंदा होले, उपनगराध्यक्ष नयना चौधरी, मुख्याधिकारी किशोर चव्हाण, भाजपा गटनेते मिलिंद वाघुळदे, काँग्रेस गटनेते कलीम मन्यार, राष्ट्रवादी गटनेते शेख कुर्बान, नगरसेवक हेमराज चौधरी यांनी केले आहे. नागरिकांनी कोरोना नियमाचे पालन करावे. पालिकेने लसीकरणाची तयारी पूर्ण केली आहे, असे पालिकेकडून सांगण्यात आले आहे.