Home आरोग्य पाचोरा येथे १५ ते १८ वयोगटातील मुलांचे लसीकरण

पाचोरा येथे १५ ते १८ वयोगटातील मुलांचे लसीकरण

0
21

पाचोरा प्रतिनिधी । राज्य शासनाने आजपासून संपुर्ण राज्यातील १५ ते १८ वर्ष वयोगटातील मुलांचे कोरोना प्रतिबंधात्मक लस देण्याचे जाहीर केले असुन आज सकाळी ९ वाजेपासून शहरातील ग्रामीण रुग्णालयात लसीकरणास प्रारंभ झाला आहे.

या लसीकरणास परिसरातील विद्यार्थ्यांमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद बघावयास मिळत आहे. या लसीकरणाचा लाभ परिसरातील विद्यार्थ्यांनी घ्यावे, असे आवाहन पाचोरा ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अमित साळुंखे यांनी केले आहे. सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत सदरचे लसीकरण केंद्र सुरु असल्याने परिसरातील विद्यार्थ्यांनी स्वतःचे आधार कार्ड अथवा नोंदणीकृत शाळेचे आयकार्ड सोबत आणावे असेही सुचित करण्यात आले आहे.

 


Protected Content

Play sound