यावल प्रतिनिधी । तालुक्यातील सावखेडासिम येथील प्राथमिक आरोग्य केन्द्रांतर्गत दहीगाव, मोहराळा व सातोद येथे आज ११०० नागरिकांना विक्रमी कोविड१९ प्रतिबंधक लसीकरण करण्यात आले आहे.
आज संपन्न झालेल्या कोविड लसीकरणास मोहीमेस नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. यावल शहरासह तालुक्यात मुबलक प्रमाणात कोविशील्ड लसीचे डोस प्राप्त झाल्याने बुधवार रोजी तालुक्यातील सर्वच कोविड लसीकरण केंद्रावर लसीकरण घेण्यात आले.
प्राथमिक आरोग्य केंद्र सावखेडासीम या अंतर्गत येणाऱ्या उपकेंद्र दहिगाव, कोरपावली व सातोद येथे नागरिकांना गावपातळीवरच लसीकरण सेवा उपलब्ध व्हावी म्हणून आवश्यकतेनुसार व लस साठा उपलब्धतेनुसार कोविड लसीकरणाचे आयोजन तालुका आरोग्य अधिकारी डॉ. हेमंत ब-हाटे, वैद्यकीय अधिकारी डॉ. गौरव भोईटे, व डॉ. प्रवीण ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पर्यवेक्षिका शोभा चौधरी व आरोग्य सहाय्यक एल. जी. तडवी हे करीत आहेत.
उपकेंद्र दहिगाव, कोरपावली व सातोद येथे कोविड लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. १८ वर्षावरील तरुण-तरुणींनी व नागरिकांनी लसीकरण केंद्रावर मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. दहिगाव येथे नागरिकांना टोकण वाटण्यात आले व त्याप्रमाणे ग्रा. पं. लसीकरण घेण्यात आले.
१८ वर्षावरील व ४५ वर्षावरील दहिगाव येथे ४४०, कोरपावली येथे ३३० व सातोद येथे ३३० असे आज ११०० नागरिकांना लस घेऊन विक्रमी लसीकरण करण्यात आले.
यावेळी दिव्यांग व्यक्ती, गरोदर माता, व दुसऱ्या डोस ला पात्र नागरिकांना प्राधान्य देण्यात आले.
लसीकरण प्रसंगी दहिगाव येथे सरपंच अजय अडकमोल, उपसरपंच किशोर महाजन, ग्रा. पं. सदस्य सत्तार तडवी, ग्रा. वि. अधिकारी योगेंद्र अहिरे व अरुण पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रवीण ठाकरे, प्रवीण सराफ समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. खालीद शेख, डॉ. रोशनआरा शेख, डॉ. राहुल गजरे, राजेंद्र बारी, अरविंद जाधव, अभय नाले, भूषण पाटील, संजय तडवी, आरोग्य सेविका अनिता नेहते शाबजान तडवी, व प्रतिभा चौधरी, दिपाली पाटील ह्या आरोग्य पथकाने लसीकरण मोहीम राबविली.
स्पॉट रजिस्टेशन अरविंद जाधव व भूषण पाटील यांनी केले. शिबिरास चंद्रकला चौधरी, कल्पना पाटील, आशा सेविका पुष्पा पाटील, नीता महाजन, भाग्यश्री महाजन, अर्चना अडकमोल, संध्या बाविस्कर, हिराबाई पांडव, हसीना तडवी, नजमा तडवी तसेच दहिगाव ग्रा. पं. चे ग्राम विकास अधिकारी योगेंद्र अहिरे अरुण पाटील, नितीन जैन, विजय पाटील, व सुधाकर पाटील आदींचे विशेष सहकार्य लाभले.