पाचोरा प्रतिनिधी । पाचोरा नगरपरिषद शिवसेनेचे माजी नगरसेवक गंगाराम पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आज (दि. १८) रोजी कोरोना प्रतिबंधक “कोविशिल्ड” लसीकरणाचे रंगार गल्ली येथे आयोजन करण्यात आले होते.
शहरातील प्रभाग क्रं. ११ मध्ये रंगार गल्ली, मोर भवन येथे लसीकरण मोहिमेत आयोजित करण्यात आली होती. यात रंगार गल्ली, गांधी चौक, रथ गल्ली, विठ्ठल मंदिर रोड भागातील सुमारे ३५० नागरिकांनी लसीकरणाचा लाभ घेतला. सदर लसीकरण केंद्रावर आमदार किशोर पाटील, नगराध्यक्ष संजय गोहील, उद्योजक मुकुंद बिल्दीकर यांनी भेट देऊन गंगाराम पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. लसीकरण मोहीम यशस्वीतेसाठी पिंटु शिंदे, संदिप खैरनार, योगेश पाथरवट, सागर पाटील, महेश शिंपी, निखिल मोर, राज अमृतकर, किशन मोर, गौरव मोर, अंकुश येवले यांनी अथक परिश्रम घेतले. तसेच ग्रामीण रुग्णालयाच्या परिचारीका वंदना भार्वे, संगिता पाटील, रंजना मोरे यांनी नागरिकांना लस दिली.