मुक्ताईनगर तालुका पत्रकार संघटनेतर्फे लसीकरण शिबीर

मुक्ताईनगर प्रतिनिधी । शहरातील प्रवर्तन चौकात मुक्ताईनगर तालुका पत्रकार संघटनेतर्फे पत्रकार दिनानिमित्त १५ ते १८ वयोगटासह नागरिकांसाठी लसीकरणाचे शिबिराचे आयोजन करण्यात आले.

 

कार्यक्रमाचे उद्घाटन प्रसंगी महामानावांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. शिबीराचे उद्घाटन वैद्यकीय अधीक्षक डॉ. योगेश राणे यांच्याहस्ते फित कापून करण्यात आले. याप्रसंगी तहसीलदार श्वेता संचेती, तालुका वैद्यकीय प्रभारी अधिकारी डॉ. देशमुख, जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष डॉ. जगदीश पाटील, संत मुक्ताई संस्थानचे उद्धव जुनारे महाराज, स्वाभिमानी शेतकरी संघटना जिल्हाध्यक्ष डॉ. विवेक सोनवणे, शिवसेनेचे गटनेते राजेंद्र हिवराळे, तालुका वैद्यकीय कार्यालयातील अर्जुन काळे, व्ही.एस. पाटील, प्रदीप काळे, ज्योती खरे, रितेश गवई, ॲड. राहुल पाटील, गणेश टांगे, विशाल पाटील, हर्षाली महाजन,निलेश भालेराव हे प्रमुख मान्यवर या प्रसंगी उपस्थित होते.

 

पत्रकार बांधवांची उपस्थिती

याप्रसंगी पत्रकार संघटनेचे तालुकाध्यक्ष शरद बोदडे, उपाध्यक्ष विनायक वाडेकर, सचिव संदीप जोगी, स्टार पत्रकार मतीन शेख मोहन मेढे, आतिक खान, प्रमोद सौंदळे, पंकज कपले, अक्षय काठोके, पंकज तायडे, विठ्ठल धनगर, नगरसेवक संतोष मराठे, राजेश चौधरी, राजेश पाटील, एम. के. पाटील, दीपक चौधरी, नितीन कासार, मुकेश महल्ले, सतीश गायकवाड, देवेंद्र काटे, अमोल वैद्य, रवी गोरे, संजय वाडीले, प्रविण भोई, छबिलदास पाटील यांच्यासह आदी पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Protected Content