यावल प्रतिनिधी । राज्यात १८ वयोगटातील तरूणांचे लसीकरण करणे राज्य शासनाने बंधनकारक केले आहे. मात्र यावल तालुक्यात लसीकरणाची गती संथ गतीने असल्यामुळे अठरा वर्षांवरील विद्यार्थ्यांचे लसीकरण महाविद्यालयीन पातळीवर करावे अशी मागणी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसने केली आहे.
यावल तालुक्यासह जिल्ह्यात लसीकरण हे अतिशय संथ गतीने केले जात आहे. त्यामुळे नागरीकांमध्ये चांगलाच गोंधळ उडाला आहे. लसीकरण करण्यासाठी को-वीन या बेबसाईटवर नोंदणी करून वेळ घेणे बंधनकारक केले आहे. परंतू लसींअभावी अठरा वर्षांवरील तरूणांसह नागरीकांना नोंदणीनंतर अपॉइण्टमेण्ट भेटत नसल्याचे दिसून येत आहे. म्हणून लसीची संख्या वाढवून लसीकरण हे महाविद्यालयीन पातळीवर राबवीले जावे जेणे करुन आरोग्य यंत्रणेवरील ताण कमी होवुन लसीकरण हे जलद गतीने करणे सोपे जाईल.
अशी मागणीचे निवेदन राष्ट्रवादी विद्यार्थ्यी कॉंग्रेसचे यावल तालुकाध्यक्ष राकेश सोनार यांनी नायब तहसीलदार आर.डी.पाटील यांच्याकडे दिले आहे. याप्रसंगी सोबत कार्यअध्यक्ष महेंद्र तायडे, जय अडकमोल उपस्थित होते.