अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील पिळोदा येथील प्रगतिशील शेतकरी उत्तमराव आत्माराम निकुंभ यांना २०२३ -२०२४ चा आदर्श शेतकरी पुरस्कार प्रदान करण्यात आला.
उत्तमराव निकुंभ यांना जिल्हा परिषद अंतर्गत कृषी विभाग जळगाव यांच्या सेस योजनेअंतर्गत नुकताच जाहीर करण्यात आला होता. राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री नामदार अनिल पाटील यांच्या हस्ते दि. ९ रोजी पंचायत समितीच्या सानेगुरुजी हॉलमध्ये हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
उत्तमराव निकुंभ यांनी शेतीत अनेक नवीन प्रयोग यशस्वीरित्या राबवून इतर शेतकर्यांसाठी प्रेरणादायी ठरले आहेत. त्यांच्या या कार्याबद्दल त्यांना आदर्श शेतकरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
पुरस्कार सोहळ्याला पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सुशांत पाटील , कृषी अधिकारी, पंचायत समितीचे कर्मचारी सह अनेक शेतकरी व मान्यवर उपस्थित होते.
या पुरस्कारामुळे उत्तमराव निकुंभ यांना प्रोत्साहन मिळेलच, शिवाय इतर शेतकर्यांनाही प्रेरणा मिळेल अशी आशा व्यक्त केली जाते आहे.