Home Cities चोपडा उष्माघाताने धानोरा येथे एकाचा बळी

उष्माघाताने धानोरा येथे एकाचा बळी


WhatsApp Image 2019 04 28 at 18.35.14

धानोरा ता.चोपडा (वार्ताहार) । गेल्या पंधरा दिवसांपासून जळगाव शहर व जिल्ह्याचे तापमान पंचेचाळीशीपार गेले आहे. त्यामुळे उन्हाचा तडाखा चांगलाच वाढला असून हे उन नागरिकांच्या जीवावर बेतू लागले आहे. गेल्या दोन दिवसांपासून उष्णतेचे तापमान 47 डीग्रीवर पोहचले आहे. चोपडा तालुक्यातील धानोरा येथील रहिवाशी सुनिल भास्कर सपकाळे (वय-40) हे कामानिमित्त बाहेर गेले होते. घरी आल्यावर ते चक्कर येवून पडल्याने मृत्यू झाला. ही घटना सायंकाळी 5 वाजता घडली.

सुनिल यांचा मृत्यू उष्माघातामुळे झाल्याचे त्याचे कुटुंबीय व ग्रामस्थांचे म्हणणे आहे. त्यामुळे एप्रिल महिन्यात जळगाव जिल्हयात वाढलेले उन जीवघेणे ठरले असून सुनिल उष्माघाताचा बळी ठरला आहे. त्यांच्या पश्चात दोन मुले, पत्नी, आई वडील असा परीवार आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound