जळगाव (प्रतिनिधी)। केसीई सोसायटी संचालित ए.टी. झांबरे माध्यमिक विद्यालयात पर्यवेक्षिका उषा नेमाडे (देशपांडे ) यांच्या सेवानिवृत्तीचा कार्यक्रम पार पाडण्यात आला. उषा नेमाडे या एम.जे.कॉलेजचे माजी प्राचार्य डी.एस.नेमाडे यांच्या कन्या आहेत. त्यांनी सन 1987 ते 2019 या आपल्या 32 वर्षाच्या कार्यकाळात केसीई सोसायटीला आपली प्रदीर्घ सेवा दिली. त्यांच्या या सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमात संस्थेचे प्रशासकीय अधिकारी शशिकांत वडोदकर, शालेय समन्वयक के.जी.फेगडे, शाळेचे मुख्याध्यापक डी.व्ही.चौधरी, प.वि.पाटील विद्यालयाच्या मुख्याध्यापिका रेखा पाटील आदी उपस्थित होते. प्रसंगी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी त्यांच्या भावी आयुष्यासाठी त्यांना शुभेच्छा दिल्यात.
पर्यवेक्षिका उषा नेमाडे यांची सेवानिवृत्ती
6 years ago
No Comments