कोल्हापूर (वृत्तसंस्था) मतदारांनी नोटा मताचा वापर न करता उपलब्ध असणाऱ्या कोणत्याही उमेदवाराला मतदान करावे. नोटा लोकशाहीला घातक असल्याचे मत राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले आहे. कोल्हापुरमधील संघाच्या पथसंचलनानंतर ते बोलत होते.
कोल्हापूरच्या शाहजी लॉ कॉलेजच्या मैदानात संघाचा विजयादशमी उत्सव झाला. या उत्सवात प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील उपस्थित आहेत. संघाच्या गणवेशात स्वयंसेवकांसोबत चंद्रकांत पाटील देखील पथसंचलनात सहभागी झालेत. दरम्यान, विजयादशमी निमित्त आज मालेगावात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पथ संचलन पार पडले.