फैजपूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | फैजपूर येथे मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतर्गंत जुना आमोदा रस्त्याचे काम सुरू आहे, परंतू येथील रस्ता निर्मिती करणार ठेकेदार त्या परिसरातील शेतातील पिकाऊ मातीचा उपयोग शेतकऱ्यांची परवानगी न घेता आपल्याला कामात वापरत आहे अशी तक्रार या शेताच्या मालक शेतकऱ्यांनी प्रांताधिकाऱ्यांना निवेदन देऊन त्या ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
यासंदर्भात सविस्तर वृत्त असे की, फैजपूर येथील जुना आमोदा रोडाजवळ यशवंत देवीदास चौधरी, वसंत देवीदास चौधरी, सुरेश धोंडू फिरके, ललितकुमार चौधरी या सर्व शेतकऱ्यांचे वडिलोपार्जित शेत जमीनी आहेत. काही दिवसापासून या रस्त्याचे मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतर्गंत काम सुरू आहे. या रस्त्याचे काम मे. केशर कॅक्टशन धुळे या ठेकेदाराने घेतले आहे. त्या रस्त्याची अंदाजित रक्कम २७३.७२ लक्ष अशी आहे. सदर काम करताना ठेकदाराला माती काम ६१० ट्रक केशर खडी ११३ ट्रक तसेच नंतर डांबरीकरण सुध्दा इस्टिमेंटमध्ये आहे. पण सदर ठेकेदार याने काम सुरू केल्यापासून पिकाऊ काळी माती संबंधित शेतातून खणूण रस्ता निर्मितीसाठी वापरत आहे. इस्टिमेटमध्ये बाहेरचे माती आणून रस्त्याचे काम करण्याचे दिलेले आहे. पण तो शेतातील माती जेसीबीने रस्तानिर्मितीचा वापरत असल्याची तक्रार या सर्व शेतकऱ्यांनी केली आहे. याबाबत चारही शेतकऱ्यांनी फैजपूर भागाच्या प्रांताधिकारी यांना निवेदन देऊन जुना आमोदा रस्त्यावरील मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतर्गत जे रस्त्याचे काम सुरू आहे त्या ठेकेदाराविरूध्द गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.