अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | अमळनेर येथे आदिवासी कोळी लोकांना टोकरेकोळी (एसटी)चे दाखले मिळावेत यासाठी १५ जुलैपासुन बेमुदत ठिय्या आंदोलनाला बसले आहेत. परंतु ८ दिवस झाले असुन प्रशासन व शासन लक्ष देत नाही आहे. या आंदोलनाकडे लक्ष दिले पाहिजे यासाठी आज २३ जुलै रोजी चोपडा तालुक्यातील बुधगाव येथील युवक उर्वेश साळुंखे यांनी अमळनेर येथील प्रांत कार्यालयाचे गेट यावर बसून लक्षवेधी आंदोलन केले.
या प्रसंगी जगन्नाथ बाविस्कर, मधुकर सोनवणे, प्रवर्तनचे मदन शिरसाठे, हिलाल सैदाणे, रामचंद्र सपकाळे, शांताराम कोळी, रावसाहेब शिरसाठ, भुषण कोळी, भिमराव कोळी, उखा कोळी, गजानन कोळी, सागर सोनवणे, सुनील कोळी, वसंत महाराज, साहेबराव कोळी, सुखदेव सोनवणे, अशोक कोळी, सुभाष रामसिंग यांच्यासह सर्व समाज बांधव उपस्थित होते.