नवी दिल्ली वृत्तसंस्था । केंद्रीय लोकसेवा आयोग म्हणजेच युपीएससीच्या नागरी सेवा परिक्षेचा निकाल लागला असून यात प्रदीप सिंग याने देशात सर्वप्रथम येण्याचा सन्मान मिळविला आहे.
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या २०१९ सालच्या मुख्य परिक्षेचा निकाल आज जाहीर झाला आहे. यात प्रदीप सिंग या विद्यार्थ्याने पहिला क्रमांक मिळवला आहे. तर जतीन किशोर आणि प्रतिभा वर्मा यांनी अनुक्रमे दुसरा व तिसरा क्रमांक मिळवला आहे. महाराष्ट्रातून अभिषेक सराफ हा विद्यार्थी सर्वप्रथम आला आहे.
यंदाच्या परिक्षेतून एकंदरीत ८२९ विद्यार्थ्यांनी आयएएस, आयपीएस, आयएफएस आदींसह अन्य सेवांसाठी निवडण्यात आले आहे. यात जनरलसह एस.सी.; एस.टी. ओबींसह आदी विविध प्रवर्गातील विद्यार्थ्यांचा समावेश आहे.