यावल – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । तालुक्यातील दहिगाव ग्रामपंचायतीचे उपसरपंच व गणेश दूध उत्पादक सहकारी संस्थेचे अध्यक्ष किशोर मधुकर महाजन यांचे अल्पशा आजाराने रुग्णालयात उपचार सुरू असताना आज निधन झाले.
दहिगाव तालुका यावल येथील रहीवाशी व ग्राम पंचायतचे उपसरपंच तथा सामाजिक कार्यकर्त किशोर मधुकर महाजन (वय-६०) यांचे आज (दि.१६ जुलै) रोजी अल्पशा आजाराने गोदावरी रुग्णालयात निधन झाले असून आज दुपारी ४ वाजता त्यांच्यावर दहिगाव येथे अत्यसंस्कार करण्यात येणार आहे. भारतीय जनता पक्षाचे उमदा कार्यकर्ते अशी त्यांनी आपली ओळख निर्माण केली होती. किशोर महाजन हे माजी मंत्री व आमदार एकनाथराव खडसे तथा माजी खासदार व आमदार हरिभाऊ जावळे यांचे ते निकटवर्ती कार्यकर्ते होते. यावल पंचायत समितीच्या माजी सभापती संध्या महाजन या त्यांच्या पत्नी असुन त्यांच्या मृत्यू पश्चात कुटुंबात पत्नी, एक मुलगा नातंवडे असे कुटुंब आहे.