जळगाव (प्रतिनिधी) शिरपूर येथे आपल्या माहेरी जात असतांना एका महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र तोडून नेल्याचा प्रकार सकाळी नविन बस स्थानकात घडलाय. बसमध्ये चढत असतांना दोन अल्पवयीन मुलींनी ही चोरी केल्याची प्राथमिक माहिती आहे. दरम्यान, चोरी करणाऱ्या अल्पवयीन मुली सीसीटीव्हीत कैद झाल्या आहेत.
याबाबत माहिती अशी की , जळगाव येथील सासर व शिरपूर येथील माहेर असलेल्या विवाहिता रूपाली गिरीश गुरव (वय 27, रा. पिंप्राळा) या आज सकाळी ११ वाजेच्या सुमारास जळगाव- शिरपूर बसने माहेरी जाण्यासाठी निघाल्या. बसमध्ये चढत असताना दोन अल्पवयीन मुलींनी त्यांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र तोडले. गर्दीतून आत गेल्यानंतर त्यांनी आरडा ओरडा केला. परंतु तो पर्यंत त्या मुली पसार झाल्या होत्या. याबाबत जिल्हापेठ पोलिसात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते. रुपाली गुरव यांच्या सोबत त्यांचे पती गिरीश भालेराव गुरव हे देखील होते. सोबत दोन मुले असल्याने पती गिरीश यांनी मुलांना बसमध्ये आत सोडण्यासाठी बसमध्ये आधीच चढले होते. तर रूपाली या बसमध्ये चढत असतांना हा प्रकार घडला.