जळगाव प्रतिनिधी । घरातील किरकोळ कारणावरून साळसिंगी ता. बोदवड येथील25 वर्षीय महिलेने शनिवारी घरात विषारी औषध घेतले होते. त्यांना खासगी रूग्णालयात उपचारार्थ दाखल केले होते. आज उपचारादरम्यान सकाळी 8.15 वाजेच्या सुमारास मृत्यू झाला असून शहर पोलीसात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी की, शुभांगी सिताराम सोनवणे (वय-25) साळसिंगी ता. बोदवड यांनी घरात उद्भवलेल्या किरकोळ कारणावरून शनिवार 18 मे रोजी रात्री 11 वाजता विषारी औषध घेवून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्यांना नातेवाईकांना तातडीने जळगावातील खासगी रूग्णालयात हलविण्यात आले. मात्र त्यांची प्रकृतीत सुधारणा झाली नाही. आज अखेर मंगळवार 21 मे रोजी सकाळी 8.20 वाजेच्या सुमारास उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी शहर पोलीसात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. प्राथामिक तपास पीएसआय मोर आणि हेकॉ परदेशी करीत आहे.