पाचोरा प्रतिनिधी | पाचोरा येथील महाराणा प्रताप चौकात तेली समाज मंडळातर्फे श्री संत जगनाडे महाराज यांच्या तैल चित्राचे अनावरण करण्यात आले.
शनिवार, दि. १ जानेवारी रोजी शहरातील महाराणा प्रताप चौक येथे पाचोरा शहर तेली समाज मंडळातर्फे श्री संत जगनाडे महाराजांच्या तैल चित्राचे अनावरण सायंकाळी करण्यात आले.
यावेळी आमदार किशोर पाटील, माजी आमदार दिलीप वाघ, माजी नगराध्यक्ष संजय गोहील, पी.टी.सी.चे चेअरमन संजय वाघ, कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष सचिन सोमवंशी, बाजार समितीचे माजी सभापती सतिष शिंदे, माजी नगराध्यक्ष शांताराम पाटील, शिवसेनेचे माजी उपजिल्हाप्रमुख प्रा.गणेश पाटील, अनावरण सोहळ्याचे प्रायोजक सतिष चौधरी, शांताराम चौधरी आदींसह तेली समाज बांधव व भगिनी यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक शांताराम चौधरी यांनी केले. सूत्रसंचालन प्रा.सी.एन.चौधरी यांनी तर आभार प्रदर्शन राजेंद्र सपकाळे यांनी केले.