यावल प्रतिनिधी । तालुक्यातील सौखेडा सिम येथे भीम आर्मी शाखेच्या फलकाचे अनावरण करण्यात आले आहे. भीम आर्मीने गाव तिथ भीम आर्मी शाखा असा संकल्प केला आहे. या संदर्भात विविध ठिकाणी शाखा स्थापन करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.
सौखेडा सिम येथे शाखा फलकाचे अनावरण भीम आर्मी महाराष्ट्र राज्य प्रवक्ते रमाकांत तायडे,राज्य सचिव सुपडू संदानशिव,जळगांव जिल्हा अध्यक्ष गणेश सपकाळे महासचिव श्रीकांत वानखेडे,मुख्य संघटक विक्रम प्रधान यांच्या साथीने व यावल तालुका अध्यक्ष हेमराज तायडे, कार्याध्यक्ष निलेश सपकाळे व उपाध्यक्ष आकाश बिऱ्हाडे यांच्या नेतृत्वात आहे.
याप्रसंगी भीम आर्मी महाराष्ट्र राज्य सचिव सुपडू संदानशिव, जळगांव जिल्हा महासचिव श्रीकांत वानखेडे, जिल्हा उपसंघटक डॉली वानखेडे, जिल्हा संघटक योगेश भालेराव, यावल तालुका कार्याध्यक्ष निलेश सपकाळे, तालुका उपाध्यक्ष आकाश बिऱ्हाडे, तालुका सह-सचिव गौरव सोनवणे, भुसावळ तालुका कार्याध्यक्ष महेश सपकाळे, विशाल वाघमारे, पंकज डांबरे, राहुल गजरे, राहुल जयकर, निखिल सावळे, सचिन वानखेडे, सतीश अडकमोल, अजय वानखेडे त्याच बरोबर सौखेडा सिम गावातील व परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चळवळीतील शेकडो कार्यकर्ते या प्रसंगी उपस्थित होते.