रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । रावेर शहरात बेशिस्त वाहतूक तसेच कुठेही होत असलेली पार्किंग नागरीकांसाठी मोठी डोकेदुखी ठरत आहे. यामुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. शहरातील रस्त्यावरुन ये-जा करतांना महीला व नागरीकांना याचा मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. या जटील समस्याकडे पोलिस निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल यांनी लक्ष देण्याची मागणी होत आहे.
रावेर शहरातील डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक, मेन रोड, छोरीया मार्केट गेट नजिक, बुरहानपुर, जेलेबी सेंटर जवळ महालक्ष्मी मंदिर नजिक रिक्शा चालक स्वता:ची रिक्शा तसेच हातगाड्या रस्त्यावर लावत असून यामुळे वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण होत आहे.तसेच सामान खरेदी करण्यासाठी आलेले लोक त्यांची खाजगी वाहने रस्त्यावर लाऊन सामान खरेदीसाठी निघुन जात असल्याने. दैनंदिन वाहतुकीस रोज अडचनीचा सामना करावा लागत आहे.अनेक दुकानात खरेदीसाठी येणाऱ्या ग्राहक देखिल त्यांचे वाहने रस्त्यात त्यांच्या दुकाना समोर उभे करून वाहतुकीला अडथळा निर्माण करत आहे. रावेरशहर आधीच संवेदनशील असल्याने वाहतुकीची समस्या किंवा कोणाचा लागलेला धक्का येथे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. या समस्येकडे पोलिस निरीक्षक डॉ विशाल जयस्वाल यांनी लक्ष देण्याची मागणी सर्वसाधारण जनतेतुन होत आहे.