Home Cities जळगाव प्रभाग समिती क्रमांक १ च्या सभापतीपदी सचिन पाटील यांची बिनविरोध निवड(व्हिडिओ)

प्रभाग समिती क्रमांक १ च्या सभापतीपदी सचिन पाटील यांची बिनविरोध निवड(व्हिडिओ)


जळगाव राहूल शिरसाळे । महापालिकेच्या प्रभाग क्रमांक १ साठी यांचा सचिन पाटील यांचा एकमेव अर्ज असल्याने पिठासीन अधिकारी तथा जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी बिनविरोध निवड केल्याची घोषणा केली.

याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त विद्या गायकवाड नगरसचिव अनिल गोराणे उपस्थित होते. जळगाव महापालिकेच्या चार प्रभाग समितीच्या सभापतींची निवड जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात येत आहे. प्रभाग क्रमांक १ साठी भाजपा फुटीर गटाचे सचिन पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यांचा एकमेव अर्ज असल्याने त्यांची निवड बिनविरोध करण्यात आल्याची घोषणा जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी केली.

https://www.facebook.com/508992935887325/videos/204319441615234

 


Protected Content

Play sound