जळगाव प्रतिनिधी । जळगाव लोकसभा मतदार संघासाठी भाजपाचे उमेदवार उन्मेश पाटील यांच्या प्रचारास सुरूवात उद्यापासून करण्यात येणार आहे.
याबाबत माहिती अशी की, जळगाव लोकसभा मतदार संघासाठी भाजपाचे अधिकृत उमेदवार उन्मेश पाटील यांच्या प्रचारार्थ रॅली उद्यापासून सुरूवात होणार आहे. सदरील प्रचार 6 एप्रिल रोजी सकाळी 7 ते दुपारी 12 वाजे दरम्यान श्रीराम मंदीर जुने जळगाव, विठ्ठल मंदीर, पांझरपोळ, रथ चौक, बालाजी मंदीर, शनि मंदीर, बळीराम मंदीर, गांधी मार्केट सराफ बाजार, सुभाष चौक, राजकमल चौक, दाणाबाजार, टॉवर चौक, घाणेकर चौक, सराफ बाजार, ब्राम्हण सभा आणि भाजपा कार्यालय बळीराम पेठ येथे समारोप होणार आहे. अशी माहिती भाजपा परवानगी प्रमुख अजय जोशी यांनी पत्रकाद्वारे कळविले आहे.