चाळीसगाव प्रतिनिधी । खासदार उन्मेष पाटील यांचा जेसीआय आणि रोटरी मिल्कसिटी यांच्या संयुक्त विद्यमाने सपत्नीक सत्कार करण्यात आला.
चाळीसगाव जेसी आय चे माजी अध्यक्ष या नात्याने खासदार उन्मेष पाटील यांचा रोटरी क्लब ऑफ मिल्कसिटी व जेसी आय च्या संयुक्त विद्यमाने नुकताच अरिहंत मंगल कार्यालयात खासदारांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर जेसी आय चे राष्ट्रीय उपाध्यक्ष सुनील अग्रवाल धुळे, माजी राष्ट्रीय कोषाध्यक्ष तथा चार्टर्ड अकाऊटंट निलेश गुप्ता, झोन अध्यक्ष गोपाल पटवारी पाचोरा, प्रमोद वाघ नाशिक, रोटरी क्लबचे अध्यक्ष राजेंद्र छाजेड, सचिव प्रकाश कुळकर्णी, जेसी आय अध्यक्ष अफसर खाटीक सर, सचिव साहिल दाभाडे जैन समाज अध्यक्ष पारसमल जैन जेसीआय संजय पवार यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. यावेळी छाजेड व खाटीक यांनी प्रास्ताविकातून कामकाजाचा आढावा मांडला आणि उन्मेष पाटील यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. खासदार उन्मेष पाटील व उमंग महिला मंडळाच्या अध्यक्षा संपदा उन्मेष पाटील यांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ तसेच मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी खासदार उन्मेष पाटील म्हणाले की, मी प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण पूर्ण केले. नव्याची कास धरत मिळेल ती नोकरी पत्करली मात्र आपण नोकरी न करता नोकरी देणारा घटक झालो पाहिजे ही खूणगाठ मनाशी बांधली ध्येय निश्चित करून नियोजन केले त्यासाठी आधी उद्योगी झालो. विविध उपक्रम राबविले यातून जेसीस शी नाते जुळले. अध्यक्ष पदाच्या कारकिर्दीत स्पीच क्राफ्ट चे आयोजन केले. यामुळे नेतृत्वासह कर्तृत्त्वाला वाव मिळाला जिवाभावाचे मित्र मिळाले.महाविद्यालयीन जीवनात युवा संसदेत स्पीकर म्हणून काम पाहिले तेथे कामाची छाप सोडली. येथेच राजकारणाचा गंध मनाला चाटून गेला. मात्र संयम ठेवत आधी उद्योगी झालो मगच राजकारणी असे त्यांनी प्रांजळपणे सांगितले. येत्या काळात राज्यातील अठ्ठेचाळीस मतदारसंघात जळगाव लोकसभा मतदार संघ आदर्श मतदार संघ म्हणून ओळखला जाईल अशी ग्वाही त्यांनी दिली.
यावेळी उपस्थित इनरव्हील क्लब, सकल जैन समाज, गायत्री परिवार, खुशाल पाटील यांची प्रगत युवा संस्था यांच्या सह अनेक मान्यवरांनी खासदार उन्मेष पाटील यांच्या विक्रमी मताधिक्याने विजयी झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन केले. मानपत्राचे शब्दांकन व वाचन निलेश गुप्ता यांनी केले तचे प्रगत युवा संस्थेने दादा एक योद्धा ही शब्दरूपी मानपत्र भेट दिले.
यावेळी देवेन पाटील प्रशांत चौधरी प्रीतम चौधरी सुनील बोरसे हरेश जैन, अंकुश सोमाणी, आशुतोष खैरनार धर्मराज खैरनार प्रसन्ना आहिरे, फय्याज शेख, आण्णा धुमाळ, विनोद पारख, किशोर पाटील धोमणेकर , मयूर अमृतकर, प्रितेश कटारिया ,बालाप्रसाद राणा , अजय जोशी डॉ.विनोद कोतकर,अरुण भावसार,सुभाष करवा, लालचंद बजाज आधार महाले रवींद्र शिरोडे इनर व्हील अध्यक्षा दिपाली राणा, नेहा गुप्ता, सुनीता जाधव ,जागृती दवे प्रा. चंद्रकांत ठोंबरे ओमप्रकाश शर्मा वसुंधरा फाउंडेशनच्या धरती पवार कल्पिता पवार रेखा जोशी ज्योती मोरे सोनाली पाटील नरेनकाका जैन, अमित सुराणा, अविनाश चौधरी यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.
गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव
यावेळी वसुंधरा फाउंडेशन चे संस्थापक सचिन पवार यांचे चिरंजीव यश सचिन पवार याची इस्रो (खडठज) संलग्न राष्ट्रीय वातावरणीय संशोधन प्रयोगशाळा येथे विशेष अभ्यास व प्रशिक्षणासाठी निवड करण्यात आली आहे.यश पवार हा भारतीय सूचना प्रोद्योगिकी संस्थान नागपूर येथे बि.टेक. च्या अंतीम वर्षाला आहे त्याचप्रमाणे रोटरी क्लबचे माजी अध्यक्ष रवींद्र शिरुडे यांचे चिरंजीव वेदांत रविन्द्र शिरुडे याची रोटरी युथ एक्सचेंज अंतर्गत फ्रान्स ला एक वर्षाच्या शिक्षणासाठी जाणार आहेत. या दोघांचे खासदार उन्मेष पाटील यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उद्योजक संजय पवार यांनी तर आभार प्रदर्शन गजानन मोरे यांनी मानले. कार्यक्रमाला व्यापारी विविध संस्थांचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.