जळगाव (प्रतिनिधी) ज्या लोकांनी माझे तिकीट कापण्याचे षड्यंत्र केले, तेच स्वत:ला माझा मानसपुत्र म्हणवून घेत मी त्यांच्या प्रचारात सहभाग घेणार असल्याच्या खोट्या बातम्या प्रसारमाध्यमांना देत आहेत. मी त्यांचा अजिबात प्रचार करणार नाही. त्या बातम्या खोट्या आहेत, असा स्पष्ट आरोप जळगावचे विद्यमान खासदार ए.टी. पाटील यांनी आज (दि.७) केला.
मी विद्यमान खासदार आहे. या निवडणुकीत पुन्हा उमेदवारी मिळावी म्हणून मी शेवटल्या क्षणापर्यंत प्रयत्न केले, पण काही लोकांनी माझा गळा कापला. तेच मी प्रचार करणार असल्याची खोटी माहिती पसरवीत आहेत. मी त्यांना विचारतो की, कुठल्या नाकाने ते मला प्रचार करायला सांगत आहेत. मी अजिबात कुणाचा प्रचार करणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. उमेदवारीचा घोळ आणि बदलाबदलीमुळे जळगाव मतदार संघात भाजपा सद्य स्थितीत काहीशी मागे पडलेली दिसत आहे. तिकीट कापल्यामुळे नाराज झालेले खा.ए.टी. पाटील त्यानंतर उमेदवारी जाहीर होवून रद्द झाल्याने नाराज झालेल्या आ. स्मिताताई वाघ या कारणांमुळे ऐनवेळी उमेदवारीची माळ गळ्यात पडलेले आ. उन्मेष पाटील यांना या निवडणुकीत चांगलीच मेहनत करावी लागणार असल्याचे चित्र सध्या आहे. त्याचवेळी त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार राष्ट्रवादीचे नेते गुलाबराव देवकर सुरवातीला उमेदवारीसाठी उत्सुक दिसत नव्हते, तरी आता मात्र त्यांनी प्रचारात चांगलीच आघाडी घेतली आहे.
Nana kendra paryant ja tumhi jalgaon kar tumchya sobat aahe . Mantripadache davedar astana shadyantra karnaryana tondavar pada swata hun nivdun yaychi evdi yanchi layki nahi fakt modichya navavar jagatayet yachi prachiti karun dya yana .