जळगाव प्रतिनिधी । जळगाव मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार आमदार उन्मेष पाटील यांना दहाव्या फेरीअखेर २,५६,८९१ मतांचा प्रचंड लीड मिळाला असून ते विजयाच्या मार्गावर आहेत.
उन्मेष पाटील यांना दहाव्या फेरीअखेर ४,४२,७६० मते मिळाली असून महाआघाडीचे गुलाबराव देवकर यांना १,८५,८६९ मते मिळाली आहेत. यामुळे उन्मेष पाटील यांना २,५६,८९१ मतांची भरभक्कम आघाडी मिळाली आहे.