नशिबात जे असते तेच मिळते – ना. पाटील

WhatsApp Image 2019 04 04 at 4.24.55 PM

जळगाव – स्मिताताई आमदार आहेत उदय वाघ हे जिल्हा अध्यक्ष आहेत. त्यांनी चिंता करण्याची गरज नाही. त्यांनी पक्षाचे काम असेच करावे. ही आणीबाणीची वेळ आहे. रुसवा, फुगव्या साठी योग्य वेळ नाही. शेवटी नशिबात असावे लागते असे सहकार राज्य मंत्री गुलाबराव पाटील यांनी सूचित केले. ते आ. उन्मेष पाटील यांना भरतीय जनता पक्षाने जळगाव लोकसभेची उमेदवारी जाहीर केल्यानंतर आज जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या जळगाव येथील संपर्क कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल पूर्वी कार्यकर्त्यांना उद्देशून बोलत होते.

 

जळगाव ग्रामीण व शहरात युतीचे आमदार असल्याने आ. राजूमामा भोळे व ना. गुलाबराव पाटील यांचावर मोठी जबाबदारी असल्याचे स्पष्ट केले. लोकसभेत युती झाली आहे विधान सभेत युती तोडू नका असा टोला ना. पाटील यांनी यावेळी भाजपला लावला. यावेळी लोकसभेचे उमेदवार आ. उन्मेष पाटील यांनी त्यांच्यावर टाकलेल्या विश्वासबद्द्ल पक्षाचे आभार मानले. यावेळी भाजप व शिवसेनेचे आमदार, जळगाव महापालिकेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Add Comment

Protected Content