जळगाव, प्रतिनिधी । कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या जयंती दिनापासून विद्यापीठ नामविस्तार दिनापर्यंत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यासाठी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ नामविस्तार आनंदोत्सव समितीची स्थापना करण्यात आली असून अध्यक्षपदी विद्यापीठाच्या नामविस्तार मागणीचे प्रमुख शिलेदार मुविकोराज कोल्हे यांची निवड करण्यात आली आहे.
राज्य शासनाने २२ मार्च २०१८ रोजी विद्यापीठाचा कवयत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ असा नामविस्तार करण्याचा ठराव विधानसभेत संमत केला होता. यानंतर दिनांक ८ ऑक्टोबर२०१८ रोजी विद्यापीठाचा कवयत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ असा नामविस्तार करण्यात आला. नामविस्ताराचा आनंदोत्सव साजरा करण्यासाठी कवयत्री बहिणाबाई चौधरी यांच्या दिनांक ११ ऑगस्टरोजी होणाऱ्या जयंती दिनापासून ते ८ ऑक्टोबर पर्यंत आनंदोत्सव समितीतर्फे काव्यवाचन, निबंध, वकृत्व व वादविवाद स्पर्धा,यासह विविध शैक्षणिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. बहिणाबाईं चौधरी यांच्या जयंती दिनी कविता गायन कार्यक्रमापासून आनंदोत्सव सोहळ्यास सुरुवात होणार आहे.
या पुढे दर वर्षी आनंदोत्सव साजरा करण्यात येणार आहे. नुकत्याच झालेल्या एका बैठकीत बहीणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ नामविस्तार आनंदोत्सव समितीच्या अध्यक्षपदी मुविकोराज कोल्हे यांची निवड करण्यात आली यावेळी विनोद देशमुख , मनोज वाणी, ललित चौधरी, मुकुंद सापकाळे, योगेश पाटील , प्रवीण महाजन, सुरेंद्र कोल्हे, प्रवीण पाटील, अजय बढे, यशवंत पाटील, प्रशांत सावंत, श्री सोनार, प्रशांत चौधरी, स्वप्नील पाटील, धनंजय भास्कर कोल्हे, चेतन, मिलींद सोनवणे, शेखर देशमुख, कमलाकर इंगळे, सुनील भारंबे, दीपक सोनार, रुपेश ठाकूर, हर्षल पाटील, युगल जैन, जुबेर खाटीक उपस्थित होते.
यशस्वीतेसाठी दिनेश हिंगणे, मोहन तिवारी, रवींद्र सैंदाणे, बाळू बाविस्कर, सुनील सोनार, राजू चौधरी, मुसाभाई बागवान, सुनील जाधव, रवींद्र महाजन, प्रभाकर तायडे, नंदू पाटील, अशपाक बागवान, राजेंद्र वाणी, विजय शिंपी, रियाज बागवान, चेतन काळे, अजय चौधरी, विशाल पाटील आदी परिश्रम घेत आहे.