बुलढाणा प्रतिनिधी । सध्या सर्वत्र ‘तानाजी’ चित्रपट गाजत असून या चित्रपटाचे तिकीट दाखवा अन् स्पर्धा परिक्षेच्या क्लासमध्ये 20 टक्के सवलत मिळवा. असा अनोखा उपक्रम बुलढाण्यातील जळगाव-जामोद येथील एक युवक राबवित असून जास्तीत जास्त तरुणांनी या सवलतीचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्याने लाईव्ह ट्रेंड न्यूज़शी बोलतांना केले आहे.
बु. जळगाव जामोद येथील सचिन वाळूकर याने सोशल मीडियाच्या माध्यमातून पोस्ट टाकत जास्तीत जास्त युवावर्ग विद्यार्थी यांनी ‘तानाजी’ चित्रपट पाहावा असे आवाहन केले आहे. छत्रपती शिवाजीराजे यांनी तानाजी मालुसरे यांच्या माध्यमातून ठेवलेले उदाहरण जास्तीत जास्त युवा पिढीपर्यंत पोहोचावे, यासाठी ही अनोखी सवलत देण्यात येत आहे.
विद्यार्थ्यांनी क्लासमध्ये प्रवेश करण्याच्या आधी तानाजी चित्रपटाचे तिकीट घेऊन अनिवार्य असणार आहे. त्याच विद्यार्थ्याला प्रवेश मिळणार असून त्या विद्यार्थ्याला २० टक्के सवलत देण्यात येणार आहे. पाहुया, सचिन वाळूकर यांनी लाईव्ह ट्रेंड न्युजशी बोलताना सविस्तर माहिती दिली, तर पाहूया काय आहे हा अभिनव उपक्रम.