वरणगाव दत्तात्रय गुरव । भुसावळ तालुक्यातील वरणगाव रेल्वे स्टेशनच्या हद्दीत एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आला आहे. वरणगाव पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्याचे काम सुरू होते.
स्थानिक रहिवाशांच्या लक्षात आल्याने ही घटना उघडकीस आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रेल्वेटेशन जवळच रेल्वे हद्दीत 35 ते 40 वयाच्या अनोळखी व्यक्तीचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आला आहे. दरम्यान झाल्या असल्याचा प्राथमिक अंदाज निदर्शनास येत आहे. जाग्यावरच शवविच्छेदन करण्यात येणार असून नगरपरिषदेच्या वतीने अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. वरणगाव पोलीस घटनास्थळी पोहोचले असून पंचनामा करण्याचे काम सध्या सुरू आहे.