जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । गेल्या दोन दिवसांपासून जळगाव जिल्ह्यात पावसाने जोर वाढविला असतांना शेतात काम करत असलेल्या एका वृध्दाच्या अंगावर वीज पडल्याने जागीच मृत्यू झाला आहे. ही घटना जळगाव तालुक्यातील शिरसोली शिवारातील शेतात मंगळवारी दुपारी साडेतीन वाजता घडली आहे. त्र्यंबक ओंकार अस्वार (वय ६८, रा.इंदीरा नगर, शिरसोली )असे मयत झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.
नातेवाईकांनी दिलेली माहिती अशी की, त्र्यंबक ओंकार अस्वार हे मंगळवारी २० ऑगस्ट रोजी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास शिरसोली शिवारातील शेतात काम करत असतांना त्यांच्या अंगावर अचानक वीज कोसळली. त्यांत त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर आजूबाजूच्या शेतात काम करणारे शेतकरी व ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेवून त्यांना तातडील जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले असता वैद्यकीय अधिकारी डॉ. रक्षा रोकडे यांनी मयत घोषीत केले. यावेळी शासकीय वैद्यकीय महाविदृयालयात नातेवाईकांनी एकच आक्रोश केला हेाता. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.