दुदैवी घटना : कानूबाई विसर्जन कार्यक्रमात पाय घसरून विहिरीत पडल्याने तरूणाचा मृत्यू

धरणगाव- लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । धरणगाव तालुक्यातील बांभोरी येथील विहिरीत कानबाईचे विसर्जन सुरू होते, त्यावेळी २३ वर्षीय हा विहिरीत डोकावून पाहत असतांना त्यांचा अचानक पाय घसरल्याने तो पाण्यात पडून बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना सोमवारी १२ ऑगस्ट रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास घडली आहे या घटनेबाबत सायंकाळी ६ वाजता धरणगाव पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. मयूर राजेंद्र पाटील वय-२३, रा. बांभोरी ता. धरणगाव असे मयत झालेल्या तरुणाचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, सोमवारी १२ ऑगस्ट रोजी सकाळी वाजत गाजत कानबाई विसर्जन मिरवणूक निघाली होती. या मिरवणुकीत मयूर पाटील याने देखील सहभाग नोंदविला होता. दरम्यान बांभोरी गावानजीक असलेल्या एका विहिरीत गावातील लोक हे कानबाई पाण्यात विसर्जन करत होते. त्यावेळी मयूर पाटील हा तरूण विहिरीच्या काठाजवळ उभा होता. तो विहिरीत डोकावून पाहत असतांना त्यावेळी त्याचा अचानक पाय घसरला आणि तो पाण्यात पडला. दरम्यान तेथील नागरिकांनी त्याला तातडीने बाहेर काढले व धरणगाव येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असता वैद्यकीय अधिकारी यांनी तपासणी यांनी मयत घोषित केले. दरम्यान ही घटना घडल्यानंतर मयूर पाटील यांच्या नातेवाईकांनी एकच आक्रोश केल्याचे पाहायला मिळाले. याप्रकरणी सायंकाळी ६ वाजता धरणगाव पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल प्रमोद पाटील हे करीत आहे.

Protected Content