रावेर तालुक्यात वेगवेगळया घटनेत तिघांचा दुर्दैवी मृत्यू

रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | रावेर तालुक्यातील कुसुंबा आणि बक्षीपुर गावात दोन दुर्दैवी घटना घडल्या आहेत. कुसुंबा येथे एका १८ वर्षीय युवतीने आत्महत्या केली असून बक्षीपुर येथे ४२ वर्षीय युवकाचा विहीरीत पाय घसरून मृत्यू झाला आहे. तर रावेर शहरातील युवकाचा मलकापूर नजिक अपघाती मृत्यू झाला आहे.

पहिल्या घटनेत, कुसुंबा येथे आई-वडील फैजपुर येथे मुलाचे ऍडमिशन करायला गेले असताना घरात कोणीही नसल्याने तबस्सूम तडवी (१८) हिने एंगलला साळीने साहायाने गळफास घेऊन आत्महत्या केली. तिची काकू पाणी आलाय सांगायला गेली असता ही दुर्दैवी घटना समोर आली.

दुसऱ्या घटनेत, बक्षीपुर येथे जगदीश ज्ञानेश्वर महाजन (४२) शेतात काम करत असताना पाय घसरून विहीरीत पडले. त्याचे चुलत भाऊ प्रविण महाजन याने फोन केला असता प्रतिसाद मिळाला नाही, त्यानंतर त्यांनी शेतात पाहिले असता जगदीश विहीरीत पडलेला आढळला. मृत्यू झालेल्या जगदीशच्या मागे एक मुलगा, एक मुलगी, आई आणि वडील असा परिवार आहे. या दोन्ही घटनांची रावेर पोलिस स्टेशनला अकस्मात नोंद करण्यात आली आहे.

 

Protected Content