यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । यावल शहरातील महाजन गल्लीमध्ये राहणारे सेवानिवृत्त नायब तहसीलदार वसंत गणपत पाटील वय-८६ वर्ष हे नियमितपणे आपल्या आरोग्याची करण्यासाठी जात असतांना बस प्रवासात हृदयविकाराच्या तीव्र झाटक्याने मृत्यू झाल्याची दुदैवी घटना शुक्रवारी घडली.
यावलकडे येत असतांना त्यांचा एसटी बस मध्येच प्रवास करीत असतांना त्यांचा मृत्यू झाला आहे. अधिक असे की, यावल येथे राहणारे वसंत पाटील हे जळगाव येथे डोळयांच्या तपासणीसाठी गेले होते. एसटी बस क्रमांक (एमएच २० बिएल ०९५३) बसमध्ये बसून परत येत असतांना दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास त्यांना ह्वदयविकाराच्या झकटा आल्याने ते बेशुद्ध पडलेनंतर साकळी गावाजवळ बस आली असता ते मरण पावले असे एसटी कर्मचारी यांनी माहिती दिली.
त्यांना बेशुद्ध अवस्थेत तात्काळ यावलच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारा साठी आणले असता , वैद्यकीय अधिकारी डॉ मयुर चौधरी यांनी तपासणी केली असता त्यांना मयत घोषीत केले. चालत्या एसटी बसमध्ये प्रवासाचा मृत्यु होण्याची पंधरा दिवसातील ही दुसरी घटना आहे. याबाबत एसटीतील यावल आगाराच्या वाहक रोशनी सोनवणे यांनी खबर दिल्याने अक्समात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. घटनेचे वृत्त कळताच यावल एसटी आगाराचे व्यवस्थापक दिलीप महाजन, वाहतुक चालक दिलीप ठाकरे यांनी ग्रामीण रूग्णालयात भेट दिली.