धरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । धरणगाव तालुक्यातील झुरखेडा येथे शेतात काम करणाऱ्या शेतमजूराला सर्पदंश झाल्याने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारादरम्यान बुधवारी ७ ऑगस्ट रोजी पहाटे सव्वा दोन वाजता मृत्यू झाला आहे. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. गेंदरसिंग वारसिंग पावरा वय ४१ रा. खरगोन जि.बडवाणी मध्यप्रदेश ह.मु. झुरखेडा ता. धरणगाव असे मयत झालेल्या मजूराचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, धरणगाव तालुक्यातील झुरखेडा गावात गेंदरसिंग पावरा हा तरूण आपल्या कुटुंबासह गेल्या वर्षभरापासून वास्तव्याला होता. शेतीचे काम करून तो आपला उदरनिर्वाह करत होता. गेंदरसिंग याला सर्पदंश झाल्याने त्याला जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर उपचारा सुरू असतांना बुधवारी ७ ऑगस्ट रोजी मध्यरात्री सव्वा दोन वाजेच्या सुमारास उपचारादरम्यान मृत्यू झाला. याबाबत जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मयताच्या पश्चात पत्नी, तीन मुली आणि दोन मुले असा परिवार आहे.